महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र'ची स्थापना, मोदींनी लोकसभेत केले जाहीर..

आम्ही अयोध्येमधील राम मंदिराच्या विकासासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' असे असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

PM Announces trust for Ram Temple in Ayodhya while talking in LS
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र'ची स्थापना, मोदींनी लोकसभेत केले जाहीर..

By

Published : Feb 5, 2020, 11:28 AM IST

Updated : Feb 5, 2020, 12:14 PM IST

नवी दिल्ली - अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये बोलताना याबाबतची घोषणा केली.

आम्ही अयोध्येमधील राम मंदिराच्या विकासासाठी एका समितीची स्थापना केली आहे. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टचे नाव 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र' असे असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. राम मंदिराबाबत निकाल जाहीर केल्यानंतर, देशातील नागरिकांनी न्यायव्यवस्थेवर दाखवलेल्या विश्वासाबाबत त्यांनी देशातील नागरिकांचे आभार मानले. देशातील १३० कोटी नागरिकांना मी सलाम करतो, असे ते म्हणाले.

अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल जाहीर करत, वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले होते. मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले होते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट करण्यात आले होते.

हेही वाचा : मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, अंतिम सुनावणी १७ मार्चपासून..

Last Updated : Feb 5, 2020, 12:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details