नवी दिल्ली - स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी क्रांतीकारक भगत सिंग यांची आज 113वी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'भारतमातेच्या या थोर पुत्राला कोटी नमन, त्यांची वीरता आणि पराक्रमाची गाथा देशवासियांना अनेक युगांपर्यंत प्रेरित करत राहील, असे टि्वट मोदींनी केले आहे.
Bhagat Singh Birth Anniversary: पंतप्रधान मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांनी वाहिली श्रद्धांजली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भगतसिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. क्रांतीकारक भगत सिंग यांचा 28 सप्टेंबर 1907 साली जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.
आपल्या परिवर्तनाकारी विचारांनी आणि अद्वितीय त्यागाने स्वतंत्रता संग्रामला नवी दिशा देणाऱ्या, तसेच देशातील युवकांना जागृत करणाऱ्या क्रांतीकारक भगत सिंग यांना वदंन, येत्या अनेक युगापर्यंत ते देशवासियांना प्रेरणा देण्याचे अखंड स्रोत असतील, असे टि्वट अमित शाह यांनी केले आहे.
क्रांतीकारक भगत सिंग यांचा 28 सप्टेंबर 1907 साली जन्म झाला होता. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ब्रिटिशांविरोधातील दिलेला लढा अजरामर ठरला.