महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारतात मजबूत सरकार आल्यामुळे आनंदी आहोत - अमेरिका - डेव्हिड केनेडी

भारताच्या नागरिकांनी मजबूत सरकार निवडले आहे. हे सरकार त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. अमेरिकेसाठी ही चांगली संधी असून आम्ही संबंधात आणखिन सुधारणा करू इच्छितो, असे विधान अमेरिकेचे सल्लागार खात्याचे मंत्री डेव्हिड केनेडी यांनी केले आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 28, 2019, 11:07 PM IST

नवी दिल्ली - भारताचे आणि अमेरिकेचे चांगले सबंध आहेत. अमेरिका भारतासोबध यापुढेही चांगले सबंध ठेवू इच्छित आहे. भारतात सध्या मजबूत सरकार सत्तेत आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो, असे विधान अमेरिकेचे सल्लागार खात्याचे मंत्री डेव्हिड केनेडी यांनी केले आहे.

डेव्हिड केनेडी म्हणाले, भारतात लोकशाही असून येथे जनतेने घेतलेला निर्णयाला कोणी आक्षेप घेत नाही. भारताच्या नागरिकांनी मजबूत सरकार निवडले आहे. हे सरकार त्यांच्यासाठी सर्वोत्तम आहे. अमेरिकेसाठी ही चांगली संधी असून आम्ही संबंधात आणखिन सुधारणा करू इच्छितो. भारत-अमेरिका आर्थिक संबंध मजबूत होत आहेत आणि यात मोठ्या प्रमाणात सुधारणा होत आहेत.

दोन्ही देशात लोकशाही असून दोघांची नितिमुल्ये समान आहेत. ही एक संधी असून आम्हांला दोन्ही देशांत असलेल्या सबंधांना आणखिन दृढ करायचे आहे. आम्ही नरेंद्र मोदी सरकारसोबत काम करण्यास उत्सुक आहोत, असेही डेव्हिड केनेडी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details