महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जया बच्चन व स्वाती मलिवाल यांच्यावर कारवाई करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका - SC

अशा खटल्यातील आरोपींवर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही पॅनल चर्चा करू नये. असे स्पष्ट आदेश न्यायालयाने द्यावेत असे याचिकेत म्हटले आहे.

DELHI
सर्वोच्च न्यायालय

By

Published : Dec 7, 2019, 3:18 PM IST

नवी दिल्ली - खासदार जया बच्चन आणि दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मलिवाल यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याता आली आहे. न्याय व्यवस्थेबाहेरील हत्येचे समर्थन केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.


अॅडव्होकेट एम.एल. शर्मा यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की जया बच्चन आणि स्वाती मलिवाल यांनी हैदराबादमधील एनकाऊंटरचे समर्थन केले आहे. ही न्यायव्यवस्थाबाह्य हत्या आहे. तिचे समर्थन करणे सर्वथा चुकीचे आहे.

हेही वाचा -बुलडाण्यात 50 वर्षीय दिव्यांग महिलेची हत्या; मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडल्याने बलात्काराचा संशय

इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील निर्देश देण्यात यावेत अशी मागणी ही याचिका करते. अशा खटल्यातील आरोपींवर जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कुठलीही पॅनल चर्चा करू नये. असे स्पष्ट आदेश न्यायालयाने द्यावेत असे याचिकेत म्हटले आहे. तसेच, जे पोलीस एनकाऊंटरमध्ये सामील होते त्यांच्यावर एफआयआर दाखल करणे, त्यांचा तपास करण्याचे निर्देश देण्याचीही मागणी केली आहे.

हेही वाचा -उन्नाव बलात्कार पीडितेचा मृत्यू, अखिलेश यादव यांचे धरणे आंदोलन

दरम्यान, अॅड. जी. एस. मनी आण प्रदीप यादव हे आधीच सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे २०१४ चे मार्गदर्शक तत्वे यात पाळली गेली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. हैदरबाद बलात्कार आणि खून खटल्यातील आरोपींचा शुक्रवारी एनकाऊंटर करण्यात आला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details