नवी दिल्ली- जामिया मिलिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यासंबधी याचिकेच्या सुनावणीवेळी काही वकिलांनी दिल्ली न्यायालयाच्या आवारात आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी काही वकिलांनी केली आहे.
हेही वाचा -LIVE : झारखंड विधानसभा निवडणूक - दुपारी एक वाजेपर्यंत ४६.५० टक्के मतदानाची नोंद
न्यायालयाने विद्यार्थ्यांना अटकेपासून संरक्षण नाकारल्यानंतर काही वकिलांनी सुनावणी करणाऱ्या खंडपीठाबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांकडे वरिष्ठ वकील, बार असोशिएनचे अध्यक्ष आणि काही वकिलांनी वकिलांवर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी. एन पटेल आणि सी, हरीशंकर यांच्या खंडपीठाकडे ही मागणी केली आहे.
हेही वाचा -#CAA : जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट हॅक
जामिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांबाबतच्या याचिकेवर निर्णय दिल्यानंतर हे प्रकरण न्यायालयाने समितीकडे सोपवले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयावर नाखूष असलेल्या काही वकिलांनी घोषणा दिल्या होत्या.