प्लास्टिकमुक्त राजस्थानचं स्वप्न उराशी बाळगून तरुण करतायेत शहरांची सफाई - clean india movment
ही सर्व तरुण 'हेल्पींग हॅन्ड' या स्वयंसेवी संघटनेची सदस्य आहेत. ५ वर्षांपूर्वी तरुणांच्या उत्साही गटाने या संस्थेची स्थापना केली आहे. संघटना स्थापन झाल्यापासून त्यांची स्वच्छतेची मोहीम सुरू आहे. आता अलवार जिल्ह्याबाहेरही त्यांच स्वच्छतेच काम पोहोचले आहे.
प्लास्टिक मुक्त राजस्थानचं स्वप्न
जयपूर - देशभरात प्लास्टिक विरोधी अभियानाची घोषणा होण्याआधीच राजस्थानातील अलवर जिल्ह्यात प्लास्टिक कचऱ्या विरोधी अभियान सुरू आहे. प्रत्येक रविवारी जिल्ह्यातील दोनशे ते अडीचशे तरुण शहरातल्या विविध भागातील कचरा गोळा करतात. शहरांतील गल्ल्या, रस्ते, मैदाने, बागा येथील कचरा दर रविवारी गोळा करण्याचं त्यांच काम ठरलेले आहे.