महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पर्यावरण रक्षणासाठी रायचूर शहरात नलिनी वाटतात मोफत कापडी पिशव्या

नगरपालिका सदस्य नलिनी चंद्रशेखर मेटी, रायचूर शहराच्या सिंधानूर भागात मोफतमध्ये कापडी पिशव्या वाटतात. प्लास्टिकपासून होणाऱ्या धोक्यांची माहितीही नलिनी नागरिकांना देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचेल.

प्लास्टिक बंदी
प्लास्टिक बंदी

By

Published : Jan 24, 2020, 10:20 AM IST

Updated : Jan 24, 2020, 2:48 PM IST

रायचूर- प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आणण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्लास्टिकला पर्याय काय? यावरही लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरण्यासाठी नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे.

हेही वाचा - पर्यावरण रक्षणासाठी आंध्र प्रदेशातील इंद्रकीलाद्री मंदिरात प्लास्टिक बंदी

नगर पालिका सदस्य नलिनी चंद्रशेखर मेटी, रायचूर शहराच्या सिंधानूर भागात मोफतमध्ये कापडी पिशव्या वाटतात. स्वत:च्या पैशांनी नलिनी यांनी ६०० कापडी पिशव्या खरेदी करून वार्ड नंबर २ मधील नागरिकांना मोफत वाटल्या आहेत. या पिशव्यांवर 'आपण स्वच्छतेकडे जात आहोत, असा संदेशही लिहला आहे.


कापडी पिशव्यांचे महत्त्व सर्वांना समजायला हवे. या पिशव्या अनेक वर्ष वापरल्या जाऊ शकतात, तसेच या पिशव्यांमध्ये १० ते १५ किलो वजनाचे साहित्य आरामशीर बसते. कापडी पिशव्यांमुळे पर्यावरणाचेही नुकसान होत नाही. जर कापडी पिशवी खराब झाली तर तिला धुवून स्वच्छही करता येते. प्लास्टिकपासून होणाऱ्या धोक्यांची माहितीही नलिनी नागरिकांना देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे नक्कीच नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहचेल.


हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : धार्मिक शहर तिरूपती आता आहे प्लास्टिमुक्त!

Last Updated : Jan 24, 2020, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details