नवी दिल्ली - काश्मीरमधील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी भाजप सरकारने आपल्या मंत्र्याना काश्मीर दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पियूष गोयल आज(रविवार) काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. स्मृती इराणी काश्मीरमधील रेसाई जिल्ह्यातील कतरा आणि पंथाल येथील परिसराला भेट देणार आहे. तर पियुष गोयल श्रीनगरला भेट देणार आहेत.
विकासाचा संदेश घेऊन मंत्री पियूष गोयल, स्मृती इराणी आज काश्मीरमध्ये - काश्मीर तणाव बातमी
काश्मीरमधील जनतेपर्यंत पोहचण्यासाठी भाजप सरकारने आपल्या मंत्र्याना काश्मीर दौऱ्यावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पियूष गोयल काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत.
३८ केंद्रीय मंत्री काश्मीरमधील विविध ६० ठिकाणांना भेटी देणार आहेत. काश्मीरमध्ये ५ ऑगस्ट २०१९ ला स्वायतत्ता काढून घेतल्यापासून तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशा काळात नागरिकांशी संपर्क वाढवण्याच्या हेतूने भाजप सरकारने हे पाऊल उचलले आहे.
मंत्री भाजप सरकारने केलेली विकास कामे आणि योजनांची माहित नागरिकांना देणार आहेत. १८ ते २४ जानेवारी दरम्यान भाजप मंत्री काश्मीमध्ये गावागांवाध्ये जाऊन विकासाचा संदेश पोहचवणार आहेत. जम्मू भागातील ५१ आणि श्रीनगर भागातील आठ ठिकाणी मंत्री जाणार आहेत.