महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

दीपक साठे यांना वैमानिकांनी दिल्ली विमानतळावर वाहिली श्रद्धांजली - दीपक साठे श्रद्धांजली न्यूज

कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साठे यांना १०० पेक्षा जास्त वैमानिकांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी एअर इंडिया, एआयएक्स, इंडिगो आणि स्पाईसजेटचे १००पेक्षा जास्त वैमानिक उपस्थित होते.

Delhi Airport
दिल्ली विमानतळ

By

Published : Aug 9, 2020, 3:10 PM IST

नवी दिल्ली -केरळच्या कोझिकोड विमानतळावर झालेल्या विमान अपघातात वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला. आज दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर साठे यांना १०० पेक्षा जास्त वैमानिकांनी श्रद्धांजली वाहिली.

दिल्ली विमानतळावर वैमानिकांनी कॅप्टन दीपक साठे यांना श्रद्धांजली वाहिली

यावेळी एअर इंडिया, एआयएक्स, इंडिगो आणि स्पाईसजेटचे १००पेक्षा जास्त वैमानिक उपस्थित होते. वैमानिकांसोबत विमानतळावरील ग्राऊंड स्टाफने देखील मृत दीपक साठे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक करत त्यांना मानवंदना दिली.

हवाईदलात अधिकारी राहिलेले कॅप्टन दीपक साठे हे कुशल लढाऊ वैमानिक होते. १५ वर्षांपासून ते एअर इंडियामध्ये वैमानिक होते. साठे हे 1981 साली हवाईदलात वैमानिक म्हणून रूजू झाले. त्याअगोदर त्यांनी पुण्याच्या एनडीएमधून प्रशिक्षण घेतले होते. 2003 पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली.

शुक्रवारी 'वंदे भारत मिशन'अंतर्गत दुबईवरून केरळला येणाऱया एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. कोझिकोड येथे लँडिंग करताना रनवेवरुन घसरल्याने हा अपघात झाला. यामध्ये १९ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १२३ प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील २४ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details