हैदराबाद -तेलंगाणामधील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. यामध्ये २ वैमानिकांचा मृत्यू झाला असून हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.
तेलंगाणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात; २ वैमानिकांचा मृत्यू - trainer aircraft crash Vikarabad district of Telangana
तेलंगाणामधील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथे विमानाचा अपघात झाला आहे. या अपघातात २ वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
तेलंगणामध्ये प्रशिक्षणासाठी उड्डान घेतलेल्या विमानाचा अपघात, २ वैमानिकांचा मृत्यू
शहरातील बेगमपेठ येथील विमानतळावरून प्रशिक्षणासाठी विमानाने उड्डाण घेतले होते. एका तासानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या अपघातामध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर या महिला वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही वैमानिकाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
काही दिवसांपुर्वीच पक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक बसल्यानंतर वैमानिकाने शेतात लॅंडिंग करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठा अपघात टळला होता.