महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जम्मू-काश्मीरमधील 4-G इंटरनेट सेवा सुरू करावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका.. - जम्मू काश्मीर फोरजी याचिका

जम्मू काश्मीरमध्ये केवळ थ्रीजी इंटरनेट सेवा सुरू आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर, रुग्ण आणि सामान्य लोकांनाही कोरोनाबाबतच्या ताज्या घडामोडी, सूचना, त्याबाबतचे खबरदारीचे उपाय हे सर्व समजण्यास वेळ लागत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

PIL seeking restoration of 4G internet in J&K filed in SC
जम्मू-काश्मीरमधील फोर-जी इंटरनेट सुरू करावे; सर्वोच्च न्यायालयात याचिका..

By

Published : Apr 3, 2020, 10:08 AM IST

नवी दिल्ली :जम्मू-काश्मीर मधील फोर-जी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात यावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. फाऊंडेशन फॉर मीडिया प्रोफेशनल्स या संस्थेमार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन केले आहे, या पार्श्वभूमीवर ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

जम्मू काश्मीरमध्ये केवळ थ्रीजी इंटरनेट सेवा सुरू आहे. त्यामुळे तेथील डॉक्टर, रुग्ण आणि सामान्य लोकांनाही कोरोनाबाबतच्या ताज्या घडामोडी, सूचना, त्याबाबतचे खबरदारीचे उपाय हे सर्व समजण्यास वेळ लागत आहे, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. लॉकडाऊनमुळे बाहेरच्या जगाशी सर्वांचा संपर्क तुटला आहे. अशा वेळी ताज्या घडामोडींची माहिती घेणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी इंटरनेट हेच एक माध्यम आहे. अशा वेळी काश्मीरमध्ये चांगली इंटरनेट सेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे ३३ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच दोघांचे बळीदेखील गेले आहेत. अशा वेळी माहितीचा स्त्रोत थांबवणे हे अकारण, बेकायदेशीर आणि असंवैधानिक असल्याचेही या याचिकेमध्ये म्हटले आहे.

मागील वर्षी ऑगस्टमध्ये कलम ३७० हटवण्यापूर्वी काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर काही काळ मोबाईल सेवाही बंद करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्या टप्प्याने मोबाईल सेवा, आणि टूजी-थ्रीजी इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

हेही वाचा :मध्यप्रदेश: आरोग्य कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणाऱ्या 7 जणांना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details