गुवाहाटी - 'सुपर ३०' चे संस्थापक आनंद कुमार यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. त्यांच्याविरोधात इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या चार विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या सर्व याचिका गुवाहाटी उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
आनंद कुमार यांच्याविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या; गुवाहाटी उच्च न्यायालयाचा दिलासा - सुपर ३० संस्थापक
कुमार हे २६ नोव्हेंबरला गुवाहाटी उच्च न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्याबद्दल कुमार यांनी न्यायालयाची माफी मागितली. कुमार यांच्याविरोधातील सर्व दावे खोटे असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले.
आनंद कुमार म्हणाले, मला न्याय मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. माझ्याविरोधात फसवणुकीची तक्रार होती. मी कधीही कोणत्या राज्याचे सरकार अथवा खासगी संस्थेकडून पैसे घेतले नाही. माझ्याविरोधात पाटणामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. तर काही विद्यार्थ्यांनी गुवाहाटीत तक्रार केली होती. मी शिक्षक आहे, तरीही फसवणुकीची तक्रार नोंदविण्यात आली. मला व माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे बिहार सरकारने माझ्यासाठी सुरक्षारक्षक दिले आहेत. न्यायालयाच्या निकालाने मी आनंदी आहे.
कुमार हे २६ नोव्हेंबरला गुवाहाटी उच्च न्यायालयात गैरहजर राहिले होते. त्याबद्दल कुमार यांनी न्यायालयाची माफी मागितली. कुमार यांच्याविरोधातील सर्व दावे खोटे असल्याचे त्यांच्या वकिलाने सांगितले.