महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पतीला नोकरीतून काढण्याची धमकी देत आयएएस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप; गुन्हा दाखल - आयएएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप

आयएएस अधिकाऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. सदर अधिकाऱ्याने बलात्कार, जीवे मारण्याची धमकी देत अश्लिल मॅसेज केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Officer
प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : Jun 4, 2020, 3:03 AM IST

रायपूर- पतीला नोकरीतून काढून टाकण्याची धमकी देत आयएएस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार पीडितेने केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन जांजगीर चांपा जिल्ह्याचे पूर्व जिल्हाधिकारी तथा आयएएस अधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्यावर बलात्कारासह, अश्लिल मॅसेज पाठवणे, ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएएस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेले पत्रक

पीडितेने बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. यावेळी पीडितेने फोटोसह काही आक्षेपार्ह ऑडिओ पुराव्यादाखल जमा केले होते. जनक प्रसाद पाठक यांनी बलात्कार, ठार मारण्याची धमकी आणि अश्लिल मॅसेज केल्याचा पीडितेने आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details