नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी 70 संशयितांची छायाचित्रे जारी केली आहेत. संबधित संशयितांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोधल्याचे पोलिसांनी सांगितले.
जामिया विद्यापीठ हिंसाचार : दिल्ली पोलीसांकडून 70 संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध - जामिया विद्यापीठ हिंसाचार
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसा प्रकरणी दिल्ली गुन्हे शाखा पोलिसांनी 70 संशयितांचे छायाचित्र जारी केले आहे.
१५ डिसेंबर रोजी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात जामिया विद्यापीठातील आंदोलनादरम्यान हिंसाचार उफळला होता. आंदोलनामध्ये संबधीत संशयितांनी हिंसाचार पसरवला होता, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. संशयितांची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांकडून बक्षीस देखील दिले जाणार आहे.
जामियातील विद्यार्थी नव्याने आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी आंदोलनाने हिंसक वळण घेतले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झाली. पोलिसांनी विनापरवानगी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थी संघटना केला होता. विद्यापीठातील आंदोलनानंतर देशभरात त्याचे प्रतिसाद उमटले होते.