कोलकाता- बेरोजगारी आणि उपासमारीमुळे बंगालच्या एका पीएचडी पदवीधारक महिलेने कुटुंबासह इच्छामरणासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. या महिलेला संगीतामध्ये पीएचडी मिळाली आहे. तिचा संशोधनचा विषय 'रवींद्रनाथ टागोर यांच्या गाण्यांमधील निसर्ग आणि मानवी मन' हा होता. मात्र, तिने पीएचडी पदवी मिळवूनही तिला नोकरी मिळाली नाही. त्यामुळे तिने इच्छामरणासाठी अर्ज केला आहे.
...म्हणून पीएचडीधारक महिलेचा कुटुंबासह इच्छामरणासाठी अर्ज - एचडी धारक
गार्गी यांचा इच्छामरणाचा अर्ज जिल्हा दंडाधिकारी चैताली चक्रवर्ती यांच्यामार्फत बरसात नगरपालिकेचे अध्यक्ष सुनील मुखर्जी यांच्याकडे पाठवला गेला. त्यावेळी जुन्या जोडप्यांना सरकारकडून भत्ता मिळतो. त्यामुळे आम्ही हे प्रकरण पाहू, असे सुनील मुखर्जी म्हणाले.
गार्गी बंड्योपाध्याय, (80) असे या महिलेचे नाव आहे. गार्गीचा जन्म दुर्गापुरात झाला आहे. तिचे वडील कमल बंड्योपाध्याय स्टील प्लांट मॅनेजर होते. तर आई प्राथमिक शाळेत शिक्षिका होती. सेवानिवृत्तीनंतर कमल दुर्गापूरहून बरसातला गेले. त्यावेळी गार्गी आणि तिची बहीण कस्तुरी यांचे लग्न झाले. त्यानंतर गार्गीचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर गार्गीला नोकरी हवी होती. त्यावेळी तिला पीएचडी पदवी असूनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे पैसे नसल्यामुळे आता या तिघांची उपासमार होत आहे.
गार्गीची आई किडनीची पेशंट आहे. तर त्यांच्याकडे फक्त बरसात येथील सत्य भारती शाळेजवळ छोटा फ्लॅट आहे. त्यांच्याकडे औषधे किंवा अन्न विकत घेण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अनेक दिवसांपासून उपासमारी होत आहे. त्यामुळे ते अशक्त होत आहेत.