हैदराबाद : फायझर कंपनीने तयार केलेली कोरोनावरील लस ९० टक्के परिणामकारक असल्याची घोषणा कंपनीने सोमवारी केली होती. यासोबतच, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडेन यांची निवड झाली. या दोन घटना जागतिक शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या ठरल्या. फायझरच्या बातमीनंतर अमेरिकेत डाऊ जोन्स (Dow) हे सुमारे तीन टक्क्यांनी वधारला, तर एस&पी ५०० हे १.१७ टक्क्यांनी वर गेले होते. मात्र, नॅसडॅक हा १.५ टक्क्यांनी खाली गेला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्थांचे कंबरडे मोडलेले असताना, हा एक आशेचा किरण असल्याचे अर्थतज्ज्ञांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
जगभरात आर्थिक मंदी सुरू आहे. त्यातच युरोपातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे आणखी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यामध्ये या दोन बातम्या खरोखरच आशादायी आहेत, असे इंडिया रेटिंग्सचे प्रमुख अर्थतज्ज्ञ सुनील सिन्हा म्हणाले. अशा परिस्थितीमध्ये चांगल्या बातम्यांची सगळेच वाट पाहत असतात. आता शेअर मार्केट तेजीत असल्यामुळे सर्वच आनंदी आहेत असेही ते म्हणाले.
सकारात्मक डॉमिनो इफेक्ट..