नवी दिल्ली- देशाची राजधानी असणाऱ्या नवी दिल्लीमधील पेट्रोलच्या किमतीने 80 रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिल्लीत डिझेलच्या किमतीनेही उच्चांक गाठला आहे. तेल कंपन्यांनी 7 जून पासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये दरवाढ सुरुच ठेवली आहे. यामुळे दोन वर्षानंतर दिल्लीतील पेट्रोलच्या किमतींनी 80 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पेट्रोलची किंमत प्रति लिटर 21 पैसे तर डिझेलची किंमत प्रति लिटर 17 पैशांनी वाढली आहे.
पेट्रोल 79 रुपये 92 पैशांवरुन 80 रुपये 13 पैसे प्रति लिटर झाले आहेत. डिझेलचा दर 80 रुपये 19 पैशांवर गेला आहे. डिझेलची किंमत 80 रुपये 2 पैसे होती. संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, दिल्ली राज्याच्या विक्रीकरानुसार दिल्लीतील दर आणि देशातील इतर राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगळे आहेत. मुंबईतील पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86 रुपये 19 पैसे असून डिझेलचा दर 78 रुपये 51 पैसे आहे.