नवी दिल्ली - भारतात सलग बाराव्या दिवशी इंधन कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आज (गुरुवार) पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५३ पैशांची तर डिझेलच्या दरात ६४ पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीमध्ये आजचे पेट्रोलचे दर ७७.८१ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर ७६.४३ रुपये प्रति लिटर इतके झाले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर आहेत. मात्र, स्थानिक बाजारपेठेमध्ये याच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
यापूर्वी बुधवारी सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. बुधवारी पेट्रोलचे दर दिल्लीत ५५ पैशांनी तर डिझेलचे दर ६९ पैशांनी वाढले होते. यानंतर आज पुन्हा इंधन दरात वाढ पाहायला मिळत आहे.
बुधवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.३२ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८०.८६ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७३.६९ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ७९.०८ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७१.३८ रुपये प्रति लिटर झाले होते. बंगळुरूत पेट्रोल ७९.७९ तर डिझेल ७२.०७ रुपये प्रति लिटर झाले होते.