नवी दिल्ली - सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. गुरुवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैशांची वाढ झाली आहे. तब्बल ८३ दिवसांनंतर रविवारी प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली होती.
दिल्लीत प्रतिलिटर पेट्रोलसाठी 74 रुपये मोजावे लागलणार आहे. तर डिझेलचा दर 72.22 रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. राज्य सरकारांनी विक्रीकर आणि इतर कर पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवर लावल्यामुळे संपूर्ण देशात इंधन दरात वाढ झाली आहे. बुधवारी हा दर प्रतिलिटर पेट्रोलसाठी 73.40 रुपये तर डिझेलचा 71.62 रुपये इतका होता.