नवी दिल्ली - मागील १६ दिवसापासून सुरू असलेली पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढ कायम आहे. आज सोमवारी दिल्लीत पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल ५८ पैशांनी वाढले. वाढीव दरानुसार, दिल्लीत पेट्रोल प्रतिलीटर ७९.५६ रुपये तर डिझेल ७८.८५ रुपयांनी विकले जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये १८ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तसेच कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे केंद्र सरकारने उत्पादन शुल्क तर राज्यांनी वॅट वाढवला आहे. यामुळे तेल कंपन्या दरवाढ करत आहेत.
आजच्या दरवाढीनंतर, मुंबईत पेट्रोलचे दर ८६.३६ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७७.२४ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८२.८७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७६.०३ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ८१.२७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७४.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे.