नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती स्थिर असतानाही सलग १४ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांनी तर डिझेलच्या दरात ६१ पैशांनी वाढ करण्यात आली. मागील १४ दिवसांत पेट्रोल ७.६२ रुपयांनी तर डिझेल ८.२८ रुपयांनी वाढले आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा तेलाच्या दरामध्ये वाढ केली. दिल्लीत आज पेट्रोल ७८.३७ तर डिझेल ७८.८८ रुपयांनी विकले जात आहे.
शनिवारच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ८५.७० रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७६.११ रुपये, चेन्नईत पेट्रोलचे दर ८२.२७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७५.२९ रुपये प्रति लिटर आणि कोलकात्यात पेट्रोलचे दर ८०.६२ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर ७३.०२ रुपये प्रति लिटर झाले होते. बंगळुरूत पेट्रोल ८१.४४ तर डिझेल ७३.८६ रुपये प्रति लिटर झाले होते.