इंदुर -मध्यप्रदेशच्या इंदैारमधील रावण भक्त महेश गोहर यांनी दरवर्षी होणाऱ्या रावण दहणाचा विरोध करत सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी रावण दहणाची प्रथा बंद करावी, अशी मागणी केली आहे.
रावण दहनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
इंदूरमधील गोहर कुटुंबीयांनी रावण दहनला विरोध करत देशभरात होणारे रावण दहन थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महेश गोहर यांनी रावणाचे इंदैारमध्ये रावणाचे भव्य मंदिर उभारले असून दरवर्षी येथे रावणाची पूजा आणि यज्ञ केले जातात. महेश गोहर हे रावण भक्त असून त्यांनी याविरोधात सर्वाेच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी अद्याप सुरू आहे. रावण दहणाचा कोणताही शास्त्रीय पुरावा नसून ही प्राचिन परंपरा नाही. तसेच या रावण दहनामुळे दरवर्षी पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ज्याप्रकारे दिल्ली, हरियाणा आणि इतर आजूबाजूच्या प्रदेशात पराटी जाळण्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे रावण दहन करण्याऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे महेश गोहर यांनी म्हटले आहे.