महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'आम्ही युक्तिवाद ऐकायला तयार तुम्ही परिणाम भोगण्यास तयार राहा' - indian muslims

भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवा, अशी विचित्र मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सर्वोच्च न्यायालय

By

Published : Mar 16, 2019, 11:03 AM IST

नवी दिल्ली - भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानात पाठवा,अशी विचित्र मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.ही कुठल्या प्रकारची याचिका आहे? तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही याचिकेत काय मागणी केली? अशा शब्दात न्यायमूर्ती रोहिंग्टन एफ नरीमन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना विचारणा केली.

आम्ही युक्तिवाद ऐकण्यासाठी तयार आहोत. मात्र, याचे परिणाम भोगण्यास तयार राहा, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्याला खडसावले. यानंतर वकिलाने कुठलाच युक्तिवाद न करणेच योग्य समजले. यानंतर न्यायालयाने ही याचिका रद्द केली.

ABOUT THE AUTHOR

...view details