सिमला (हिमाचल प्रदेश) - जिल्ह्याच्या नारकंडा येथे एका चरस तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल 2 किलो 58 ग्रॅम चरस पोलिसांनी जप्त केली आहे. राजकुमार तहसील आनी (वय 32 वर्षे, रा. कुल्लू), असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
सिमला : सुमारे दोन किलो चरससह एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात - शिमला बातमी
सिमल्याच्या नारकंडा येथे एका व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून 2 किलो 58 ग्रॅम चरस जप्त केली आहे.
संग्रहित छायाचित्र
एक व्यक्ती एका प्रवासी जीपमधून चरस घेऊन सिमल्याला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबत चौकशी करत नारकंडाजवळ नाकाबंदी केली. त्यावेळी संशयित व्यक्ती हा जीपमधून जात होता. त्याची झडती घेतली असता पोलिसांना चरस सापडले. याबाबत गुन्हा करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महेबुबा मुफ्तींची नजरकैदेतून सुटका
Last Updated : Oct 14, 2020, 6:01 AM IST