महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिहारमध्ये कन्हैया कुमारच्या सभेला पुन्हा  विरोध - PEOPLE THREW SLIPPERS ON KANHAIYA KUMAR

आज पुन्हा कन्हैयाच्या सभेचा काही लोकांनी विरोध केला. तसेच कन्हैयाच्या ताफ्यावर चप्पला आणि बुट फेकून त्याचा निषेध केला.

कन्हैया
कन्हैया

By

Published : Feb 7, 2020, 10:00 PM IST

कटिहार - भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा नेता कन्हैया कुमारच्या ताफ्यावर नुकताच हल्ला झाला होता. आज पुन्हा कन्हैयाच्या सभेचा काही लोकांनी विरोध केला. तसेच कन्हैयाच्या ताफ्यावर चप्पला आणि बुट फेकून त्याचा निषेध केला आणि देशद्रोही कन्हैया कुमार अशी घोषणाबाजी केली.

जन-गण-मन मोहिमेअंतर्गत एका सभेला संबोधित करण्यासाठी कन्हैया कुमार शुक्रवारी कटिहार येथे पोहचले होते. यावेळी स्थानिक लोकांनी त्यांचा कडाडून विरोध केला. सभेनंतर परत जाताना कन्हैयाच्या ताफ्यावर चप्पल आणि बूट फेकले. जिल्ह्यामध्ये परीक्षा सुरू असून कलम 144 लागू असताना कन्हैया कुमारला सभा घेण्यास परवानगी कशी काय देण्यात आली, असे सवाल लोकांनी विचारले. त्यांनी प्रशासन आणि आयोजकांवर कारवाईची मागणी केली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NRP) याविरोधात कन्हैया कुमार याने जन-गण-मन यात्रा काढली आहे. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या यात्रेदरम्यान कन्हैया कुमार बिहारमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. यादरम्यान त्याच्या तब्बल ५० सभा होणार आहेत. बेतिया येथून ३० जानेवारीपासून जन-गण-मन यात्रेची सुरुवात झाली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details