नवी दिल्ली -शहरामध्ये राष्ट्रीय ललित कला विभागाकडून 61 वे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये मनवीर सिंह यांचे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेले पेंटींग पाहायला मिळाले. प्लास्टिकच्या कचऱ्यापासून अत्यंत सुंदर असे पेंटींग मनवीर सिंह यांनी तयार केले आहे.
नो टू सिंगल यूज प्लास्टिक : चक्क प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवले पेंटींग - प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बनवले पेंटिंग
प्लास्टिकच्या कचऱ्यापासून विविध गोष्टी बनवता येऊ शकतात, याबाबत तुम्हाला माहितीच असेल. मात्र, याच सिंगल यूज प्लास्टिकपासून गाजीपूर येथील मनवीर सिंह यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पेंटींग तयार केली आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्यापासून विविध गोष्टी बनवता येऊ शकतात, याबाबत तुम्हाला माहितीच असेल. मात्र, याच सिंगल यूज प्लास्टिकपासून गाजीपूर येथील मनवीर सिंह यांनी प्लास्टिकच्या कचऱ्यापासून पेंटींग तयार केली आहे. पेंटींग तयार करण्यासाठी मनवीर सिंह यांनी वेगवेगळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा वापर केला आहे.
प्रदर्शनाला भेट दिलेल्या लोकांनीही या अनोख्या पेंटींगचे कौतुक केले आहे. देशभरामध्ये प्लास्टिकविरोधी मोहिम सुरू असून मनवीर सिंह यांच्या पेंटींगमधून नक्कीच नागरिकांमध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचेल.