गाझियाबाद- एखाद्या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह प्रमुखाकडून नातेवाईकांना सोपवला जातो. मात्र, कोरोना झालेल्या व्यक्तीचा मृतदेह घेण्यास नकार देणारेही अनेक जण आहेत. अशातच गाझियाबाद येथील विद्युत दाहिनीचे प्रशासक मनोज प्रभात यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला आहे.
सद्यस्थितीत कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास नातेवाईक अंत्यसंस्कार देखील करत नाही. अशावेळी विद्युत दाहिनीच्या कर्मचाऱ्यांनाच अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मात्र, काही घटनांमध्ये नातेवाईक किंवा कुटुंबीय मृतदेहाजवळ आले नसले तरी मृतदेहावरील सोन्याचे अथवा इतर दागिने घेण्यासाठी अंतिम संस्कारानंतर राखेत त्याचा शोध घेत आहेत.
कोरोनाबाधिताच्या मृतदेहाच्या राखेत दागिने शोधतात नातेवाईक एका घटनेत मृताच्या शरीरावरील सोन्याचे कडे घेण्यासाठी नातेवाईक या विद्युत दाहिनीजवळ उभे राहीले. अंतिम संस्कारानंतर मृताच्या शरीराच्या राखेतील सोन्याचे कडे घेऊन ते नातेवाईक निघून गेले, असे मनोज प्रभात यांनी सांगितले. हेच नातेवाईक या मृतदेहाजवळ जाण्यास नकार देत होते, असेही मनोज सांगतात.
सॅनिटाईझेशन केल्यानंतर पॅक करून आणतात मृतदेह -
विद्युत दाहिनीचे प्रमुख मनोज सांगतात, की या मोक्ष स्थळी मृतदेह आणताना ती दोन टप्प्यात पॅक केली जाते. तसेच मृतदेह दोन वेळा सॅनिटाईझ केला जातो. त्यामुळे मृतदेहावर कुठले दागिने असले, तरी त्याबद्दल आम्हाला माहिती नसते. त्यामुळे त्या राखेतूनच नातेवाईक दागिने काढून घेऊन जातात.