नवादा (बिहार) - विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान सध्या सुरू आहे. लोकांनी मतदानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भाग गोविंदपूर विधानसभा मतदासंघात मतदार 35 किमी ट्रक्टरने प्रवास करत आपल्या मतदानाचे कर्तव्य बजावले आहे.
- मदतानासाठी गावकऱ्यांनी काढली वर्गणी
दानियां गावातील गावकऱ्यांनी मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी वर्गणी जमा केली. त्या पैशातून ट्रक्टरची व्यवस्था करत जंगलपासून सुमारे 35 किलोमिटरचा प्रवास केला. त्यानंतर मतदारांनी पचम्बा येथील मतदान केंद्र क्रमांक - 311 वर मतदान केले. - मतदारांमध्ये मोठे उत्साह
गोविंदपूर विधानसभा मतदारसंघातील मतदाता एकत्र येत आहेत. नक्षल प्रभावित क्षेत्रातील असूनही कौआकोल भागातील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मतदान केंद्र क्रमांक-285 वर मतदानसाठी लांब रांगा लागल्या होत्या.