महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांचे आंदोलन - veterinary doctor abuse

शहरातील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिक आंदोलन करत आहेत.

आंदोलन,  protest at shadnagar
आंदोलन

By

Published : Nov 30, 2019, 1:34 PM IST

हैदराबाद - शहरातील पशुवैद्यकीय महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. शादनगर पोलीस ठाण्याबाहेर नागरिक आंदोलन करत आहेत. आरोपींवर कडक कारवाई केली जावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा -झारखंड विधानसभा निवडणूक: नक्षलवाद्यांनी बॉम्बस्फोटने उडवला पूल, तर काँग्रेस उमेदवारावर दगडफेक

या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांची दमछाक झाली आहे. आरोपींना फाशीची शिक्षा दिली जावी अशी, मागणी आंदोलकाकडून करण्यात येत आहे. याबरोबरच आरोपींना कोणत्याही प्रकारचे कायदेशीर सहाय्य करणार नाही, असा निर्णय शादनगर बार असोशिएशनने घेतला आहे.

हेही वाचा -पशुवैद्यकीय डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण; ४८ तासांमध्ये आरोपी ताब्यात..

बुधवारी रात्री रुग्णालयातून घरी जात असताना महिलेच्या गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे त्या महामार्गावरील टोल प्लाझाजवळ थांबल्या होत्या. तेव्हा चार आरोपींनी महिलेवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता. तसेच त्यांचा मृतदेह जाळला होता. शेवटी महिलेचे तिच्या बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन बंद असल्याचे समजले. त्यानंतर दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सायंकाळी बहिणीने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details