नवी दिल्ली - कोरोना महामारीचा सामना करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोरोना सेनानी' अशी उपाधी दिली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, लष्कर आणि माध्यम प्रतिनिधी घराबाहेर पडून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. काही ठिकाणी अशा लोकांवर हल्ले झाल्याच्याही धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी लोक या कोरोना सेनानींसाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसून आले. दिल्लीच्या गणेशनगरमध्ये एका कुटुंबाने घरातून 'कोरोना सेनानीं'च्यासाठी प्रार्थऩा केली.
कोरोनापासून सर्वांचे रक्षण व्हावे, घरात बसून लोक करताहेत प्रार्थना - corona latest update
कोरोना महामारीचा सामना करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'कोरोना सेनानी' अशी उपाधी दिली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत डॉक्टर, पोलीस, लष्कर आणि माध्यम प्रतिनिधी घराबाहेर पडून त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. काही ठिकाणी अशा लोकांवर हल्ले झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. तर काही ठिकाणी लोक या कोरोना सेनानींसाठी देवाकडे प्रार्थना करताना दिसून आले. दिल्लीच्या गणेशनगरमध्ये एका कुटुंबाने घरातून 'कोरोना सेनानीं'च्यासाठी प्रार्थऩा केली.
corona
कोरोना विषाणूचा धोका नष्ट व्हावा यासाठी या कुटुंबातील आबालवृद्ध देवाकडे प्रार्थना करत आहेत. कोरोनाबाधित लोक लवकरात-लवकर बरे व्हावेत. ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला त्यातून सावरण्याचे बळ मिळावे यासाठी आम्ही प्रार्थना करत असल्याचे कुटुंबातील एका महिलेने सांगितले.