पूर्णिया -भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी असलेल्या 'पाकिस्तान'चे नाव असलेले एक गाव बिहारमध्ये आहे. म्हणजे पूर्णिया जिल्ह्यातील या गावाचे नाव चक्क 'पाकिस्तान' आहे. येथील रहिवाशांची ते बदलून 'बिरसा नगर' असे असे केले जावे, अशी इच्छा आहे. कारण 'पाकिस्तान' या नावामुळे त्यांची चेष्टा होत असल्याचे आणि शरमिंदा व्हावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील हे गाव श्रीनगर ब्लॉक में सिंधिया ग्राम पंचायतीत येते. येथील लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे आपल्या मागणीचे पत्र लिहून ते बीडीओकडे सुपूर्द केले आहे.
'बिरसा नगर' ठेवावे नाव
हे गाव जिल्हा मुख्यालयापासून साधारण 35 किलोमीटरवर आहे. या गावात केवळ आदिवासी समुदायाचे लोक राहतात. येथील एकूण लोकसंख्या जवळजवळ 1200 आहे. येथील लोकांचे म्हणणे आहे. गावाचे 'पाकिस्तान' हे नाव बदलून भगवान बिरसा मुंडा यांच्या नावावरून ते 'बिरसा नगर' असे केले जावे, अशी येथील लोकांची इच्छा आहे.
पाकिस्तानविरोधात राग
येथील लोकांचा पाकिस्तानवर प्रचंड राग आहे. भारतात दहशतवाद पसरवणे आणि भारताविरोधात विषारी प्रचार करणे हे पाकिस्तानचे राजचे काम झाले आहे. हे सर्व सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे येथील लोकांच्या मनात 'पाकिस्तान' या नावाविषयीच तिरस्कार निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वानुमते, गावाचे नावच बदलण्याचा निश्चय करण्यात आला असल्याचे येथील रहिवाशी सांगतात.