पाटणा- देशव्यापी लॉकडाउनमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडित होण्यास मदत होत आहे. मात्र, तरीही काही नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे संक्रमित होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात बसावे यासाठी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील प्राणी प्रेमी महेंद्र प्रधान यांनी लोकांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला हत्तीवर बसवून जागृती मोहीम सुरू केली आहे.
मोदी सारखा दिसणारा व्यक्ती हत्तीवर... नागरिकांना घरात बसण्याचे करतोय आवाहन - People made aware of corona by disguising PM Modi in samastipur
नागरिकांनी घरात बसावे यासाठी बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील प्राणी प्रेमी महेंद्र प्रधान यांनी लोकांना जागरुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीली हत्तीवर बसवून जागृती मोहीम सुरू केली आहे.
people-made-aware-of-corona-by-disguising-pm-modi-in-samastipur
हेही वाचा-मुंबईत कोरोनाचे आज 417 नवे रुग्ण; 20 जणांचा मृत्यू तर एकूण रुग्ण संख्या 6874 वर
सोशल डिस्टन्स पाळत मुख्य रस्त्यावरुन हत्ती फिरवला जात आहे. नागरिकांनी घरात बसावे, काळजी घ्यावी, अशा प्रकारचे आवाहनही ती व्यक्ती नागरिकांना करीत आहे.