शिमला - हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मागील काही दिवसांत जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर बर्फचे थर साचल्याने लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत.
शिमल्यात बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
शिमल्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे काही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यास अडचणी येत आहेत.
सर्वात जास्त अडचणी दूध पुरवठ्यासाठी होत आहेत. सामान्यपणे सकाळी लवकर येणारे दूधवाले दुपार उलटून गेल्यानंतर दूधपुरवठा करत आहेत. रस्त्यांवर जमा झालेला बर्फ बाजूला काढण्यासाठी प्रशासनातर्फे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तरीही काही वाहतूक मार्ग बंद आहेत.
हेही वाचा - हिमवर्षावामुळे हजारो नागरिक मनालीत अडकले; जादा भाडे वसूलनाऱ्या टॅक्सी चालकांवर कारवाई
रस्ते बंद असल्याने बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटकही हॉटेलमध्येच थांबून आहेत. येत्या 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान पुन्हा जोरदार बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. काही ठिकाणी पाऊसही होऊ शकतो.