महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शिमला : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी स्थानिकांचा पुढाकार, १०० जणांना मोफत धान्यवाटप - प्रवासी मजदूरों को दिया राशन शिमला

शिमल्यातील विकासनगर येथे अडकून पडलेल्या १०० हून अधिक मजुरांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी अन्नधान्याचे वितरण केले. यामध्ये डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, बटाटे आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, स्थानिकांनी हे धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचेही पूर्णपणे पालन केले.

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी स्थानिकांचा पुढाकार
लॉक डाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी स्थानिकांचा पुढाकार

By

Published : Apr 8, 2020, 11:57 AM IST

शिमला -कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातून कामासाठी स्थलांतरित झालेले मजूर अडकून पडले आहेत. शिमला येथील विकासनगरमध्ये अडकून पडलेल्या अशाच काही मजूर बांधवांसाठी स्थानिकांनी अन्नधान्याचे वाटप केले.

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला आणि उपासमारीची वेळ येऊन ठेपली. परराज्यातून काम करण्यासाठी स्थलांतरित झालेल्या अनेक कामगारांवर, मजुरांवर अन्नपाणी नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासन या नागरिकांसाठी अनेक उपयायोजनाही राबवत असूनही काहींपर्यंत या सुविधा पोहचू शकत नाहीत.

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या मजुरांसाठी स्थानिकांचा पुढाकार

शिमल्यातील विकासनगर येथे अडकून पडलेल्या १०० हून अधिक मजुरांसाठी येथील स्थानिक नागरिकांनी अन्नधान्याचे वितरण केले. यामध्ये डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, बटाटे आदि साहित्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, स्थानिकांनी हे धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचेही पूर्णपणे पालन केले.

याबाबत माहिती देताना येथील स्थानिक बालकृष्ण धलौटा म्हणाले, 'कोरोनाचे संकट खूप मोठे आहे, अशावेळी शक्य तितकी मदत करण्याचे ठरवले. असे कितीतरी लोक आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही आणि उपासमार होते. याबाबत चर्चा करून आम्ही गरजूंना धान्यवाटप करण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली. धान्याचे वाटप करतानाही आम्ही गर्भवती महिलांना सर्वात आधी धान्याचे वाटप केले.'

त्यांच्यासोबत येथील पोलीस प्रशासनही मदतीला पुढे आले. त्यांनी अन्नधान्याचे वाटप होताना उपस्थित लोकांनी दीड ते दोन मीटरच्या अंतरावर उभे राहावे, याची काळजी घेतली. तसेच उपस्थित संपूर्ण लोकांचे तोंडावर मास्क असण्यासाठीचीही काळजी घेतली. यासोबतच, ज्या ठिकाणी अन्नधान्याचे वाटप करण्यात आले, ती जागाही व्यवस्थितरित्या सॅनिटाईझ करण्यात आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details