श्रीनगर( जम्मू आणि काश्मीर)-नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचे प्रायोजकत्व चिनी मोबाईल कंपनी विवो यांच्याकडे कायम ठेवल्यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चिनी सैन्याने जून महिन्यात लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीची नंतर भारतीय नागरिक चिनी वस्तूंचा बहिष्कार करत असताना आयपीएलने चिनी कंपनीचे प्रायोजकत्व सुरु ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा मुद्दा ओमर अब्दुल्ला यांनी उपस्थित केला.
चिनी मोबाईल कंपनी विवो आयपीएलची टायटल स्पॉन्सर आहे. एकीकडे लोकांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा, असे आवाहन केले जात आहे, असेही ते म्हणाले.
चीन मधून होणारी गुंतवणूक,प्रायोजकत्व, जाहिराती यांच्या बद्दल याबद्दल आपण संभ्रमात असल्यामुळे चीन याचा नक्की फायदा उठवेल , असे ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले.
संयुक्त अरब अमिरात मध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेसाठी टायटल स्पॉन्सर म्हणून चिनी मोबाईल कंपनी विवो सोबतचा करार कायम ठेवण्याचा निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलने घेतल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बीसीसीआय आणि आयपीएलच्या गव्हर्नमेंट कौन्सिल ने सर्व प्रायोजकांची करार कायम ठेवण्याची भूमिका घेतली यामुळे चिनी मोबाईल कंपनी विवो चे प्रायोजकत्व कायम राहिले. चिनी कंपन्यांच्या टीव्ही सेट ज्या लोकांनी बाल्कनीत उभा राहून फेकून दिल्या त्यांच्याबद्दल आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल ने घेतलेल्या निर्णयामुळे वाईट वाटते असे,ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले.