नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकारचे लाखो दावे खोटे सिद्ध होताना दिसत आहेत. ज्यात ते दिल्लीतील प्रत्येक गरजूच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करत असल्याचे सांगत आहेत. दिल्लीच्या ग्रीनपार्कजवळील नागरिकांकडे आजही राहण्यासाठी काहीही सुविधा नाही. अशा परिस्थितीत हे लोक फुटपाथवरच दिवस काढत आहेत. याच कारणामुळे या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दिल्ली सरकारचे दावे फोल, लॉकडाऊनदरम्यान गरजू फूटपाथवर काढतायेत दिवस - दिल्ली सरकारचे दावे फोल
दिल्लीच्या ग्रीनपार्कजवळील नागरिकांकडे आजही राहण्यासाठी काहीही सुविधा नाही. अशा परिस्थितीत हे लोक फुटपाथवरच दिवस काढत आहेत. याच कारणामुळे या नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने याठिकाणी जाऊन पाहणी केली असता, ग्रीनपार्कचा मुख्य रस्ता गरजूंच्या राहण्याचे ठिकाण झाले असल्याचे निदर्शनास आले. दिल्ली सरकारने घोषणा केली होती, की दिल्लीत जेवढे लोक आहेत त्या सर्वांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सरकारद्वारा केली जाणार आहे. तर दुसरीकडे अनेक लोक रस्त्यांवरच दिवस काढत आहेत. सरकारच्या लाखो दाव्यांनंतरही या गरजूंना मात्र अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.