नवी दिल्ली -राजस्थानमधील दिल्ली-अलवर महामार्गावर २ वर्षांपूर्वी पहलू खान आणि त्याच्या २ मुलांचा गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी पहलू खान याच्याविरोधात गोवंश तस्करीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. आज राजस्थान पोलिसांना तस्करीचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याचे आदेश राजस्थान उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या पिकअप वाहनाचाही समावेश करण्यात आला होता.
पहलू खानवरील गायींच्या तस्करीचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द, राजस्थान न्यायालयाचा आदेश
राजस्थानमधील दिल्ली-अलवर महामार्गावर २ वर्षांपूर्वी पहलू खान आणि त्याच्या २ मुलांचा गोरक्षकांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला होता.
डेअरी चालक असलेले पहलू खान आणि त्याची २ मुले राजस्थानमधून गाय खरेदी करुन हरियाणाला जात होते. परंतु, १ एप्रिल २०१७ ला गोरक्षकाच्या जमावाने गोवंश तस्करीच्या नावाखाली पहलू खान आणि त्याच्या २ मुलांना मारहाण केली. गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या पहलू खान यांचा २ दिवसानंतर मृत्यू झाला होता. या घटनेनंतर, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता
नुकतचं राजस्थानच्या अलवर जिल्हा न्यायालयाने पहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणावर निर्णय दिला आहे. न्यायालयाने नऊ पैकी सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. केवळ संशय असल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संशयाचा फायदा देत आरोपींची सुटका करण्यात आली आहे. या निकालाच्या विरोधामध्ये दाद मागणार असल्याचे पहलू खानचा मुलाग इरशादने म्हटले होते. याप्रकरणातील 3 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांच्या विरोधात बाल न्यायालयात सुनावणी सुरु आहे.