'चौकीदार चोरच नाही तर खूनी, भ्रष्टाचारी, बलात्कारी आणि घोटाळेबाज' - Jammu Kashmir
पंतप्रधान मोदींनी मै भी चौकीदार ही प्रचार मोहीम सुरू केली आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी टि्वटरवर स्वत:च्या नावासमोर 'चौकीदार' लिहिले आहे.
श्रीनगर - पीडीपीचे नेते फिरदौस टाक यांनी भाजपच्या चौकीदार मोहिमेवर हल्लाबोल केला. देशाला अनेक लोक लुटून गेले त्यामुळे चौकीदार चोर असल्याचे टाक यांनी सांगितले.
'चौकीदार फ्रॉड आहे कारण राफेल घोटाळा झाला आहे. चौकीदार खूनीसुद्धा आहे कारण अखलाखची हत्या झाली. चौकीदार बलात्कारी सुद्धा आहे कारण आसिफावर अत्याचार झाले आहेत', असेही फिरदौस यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी मै भी चौकीदार ही प्रचार मोहीम सुरू केली आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी टि्वटरवर स्वत:च्या नावासमोर 'चौकीदार' लिहिले आहे. पंतप्रधान मोदींनीही टि्वटरवर 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे नामकरण केले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना फिरदौस यांनी टीका केली आहे.
काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन मोदींवर 'चौकीदार चोर है' अशी टीका केली होती. यानंतर भाजपने याला प्रत्युत्तर देत मै भी चौकीदार मोहिमच सुरू केली.