महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

प्रयागराजमधील कुख्यात गुंड जुल्फिकारच्या अवैध इमारतीवर तोडक कारवाई - शूटर जुल्फिकार

प्रयागराजमध्ये रविवारी माजी खासदार अतिक अहमद यांचा खास शूटर जुल्फिकारच्या मालकीची इमारत पाडण्यात आली. जुल्फिकार सध्या नैनी तुरुंगात आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड जुल्फिकारचे तीन मजली घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. हे नकाशाशिवाय बांधले गेले होते, असेही कारण अधिकाऱ्यांनी सांगितले.

pda-demolish-house-of-zulfiqar-shooter-of-atik-ahmed-in-prayagraj
प्रयागराजमधील कुख्यात गुंड जुल्फिकारच्या अवैध इमारतीवर तोडक कारवाई

By

Published : Oct 18, 2020, 5:57 PM IST

प्रयागराज(उत्तर प्रदेश) - जिल्ह्यात गुन्हेगार आणि भूमाफियांच्या विरोधात पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. यातच रविवारी अतिक अहमदचा खास शूटर जुल्फिकार ऊर्फ तोता याच्या अवैध संपत्तीवर प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून तोडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अवैध इमारत पूर्णतः जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही इमारत नकाशाशिवाय बांधण्यात आल्याचे प्रयागराज विकास प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.

प्रयागराजमधील कुख्यात गुंड जुल्फिकारच्या अवैध इमारतीवर तोडक कारवाई

प्रयागराजमध्ये रविवारी माजी खासदार अतिक अहमद यांचा खास शूटर जुल्फिकारच्या मालकीची इमारत पाडण्यात आली. जुल्फिकार सध्या नैनी तुरुंगात आहे. जुल्फिकार याने माजी खासदार अतिक अहमदच्या सांगण्यानुसार अनेक खून केले आहेत. बरेलीत झालेल्या दुहेरी हत्याकांडातदेखील जुल्फिकार मुख्य आरोपी आहे. याशिवाय जुल्फिकारने तुरुंगात राहून बेनीगंजमध्ये रवी पासी नावाच्या व्यक्तीची हत्या करायला लावली होती. काही दिवसांपूर्वी रवी पासीच्या कुटुंबीयांना जेलमधून धमकी मिळाली होती. त्यामध्येही जुल्फिकारचे नाव समोर आले होते. जुल्फिकारवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या संपत्तीवर पोलिसांची नजर असून अवैध संपत्ती आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.

ABOUT THE AUTHOR

...view details