भोपाळ- बंगळुरूमध्ये ठेवण्यात आलेल्या बंडखोर काँग्रेस नेत्यांना संमोहित केले जात आहे, असा आरोप मध्य प्रदेश काँग्रेस नेते पी. सी. शर्मा यांनी रविवारी केला. आज (सोमवार) होणाऱ्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले, की या काँग्रेस नेत्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांनाही त्रास देण्यात येत आहे. यासोबतच काही लोक त्यांना राज्यात परत येण्यापासूनही मज्जाव करत आहेत.
ज्योतिरादित्य सिंधियांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांच्यासह अन्य २२ आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यामुळे मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार अल्पमतात गेले आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना कर्नाटकच्या बंगळुरूमधील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. यानंतर, काँग्रेसने आपल्या बाकी आमदारांना गुजरातला पाठवले होते.
हेही वाचा :मध्यप्रदेशमध्ये शक्तीप्रदर्शन.. सत्ता टिकवण्याचे 'कमल'नाथ यांच्यासमोर आव्हानं, बहुमत चाचणी आज