जयपूर- पुणे येथील एका रुग्णाला कॅन्सरच्या उपचारासाठी एअर लिफ्ट करत उपचारांसाठी जयपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जैन ईनटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया 6 तास सुरु होती.
पुण्यावरून जयपूरला एअरलिफ्ट केलेल्या कॅन्सर रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया - air lift
ऑल्फेक्ट्री न्यूरोब्लॉस्टोमा हा गंभीर आजार पुमे येथील अनिल अनप्पा राव यांना झाला होता. त्रास वाढू लागल्याने त्यांच्या परवानगीने त्यांना जयपूरला विमानाने नेण्यात आले होते. जैन ईनटी हॉस्पिटलमध्ये या रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

जैन ईनटी हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश जैन यांनी कॅन्सरच्या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले. अनिल राव या रुग्णाच्या नाकातून गेल्या महिन्याभरापासून रक्त येत होते. जैन यांनी हा आजार अतिगंभीर असल्याचे सांगितले. 25 लाख लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीला नाकाच्या आत कॅन्सर होतो असे ते म्हणाले. या प्रकारचा कॅन्सर नाकाच्या आतमधून सुरु होतो आणि तो मेंदूपर्यंत पोहोचतो.