सत्यमंगलम -एका खासगी बसचा मोठा अपघात होता होता टळला आहे. ज्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचलेत. मंगळवारी सत्यमंगलम-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गावर चालकाच्या हुशारीमुळे बस दरीत कोसळण्यापासून वाचली.
काळ आला होता, पण... खासगी बसचा मोठा अपघात टळला
एका खासगी बसचा मोठा अपघात होता होता टळला आहे
म्हैसूर येथून 50 हून अधिक प्रवाशांना घेऊन खासगी बस तमिळनाडूतील इरोडच्या दिशेने जात होती. यावेळी बसचा ताबा सुटल्याने बस थिंबम डोंगराळ मार्गावरील पुलाच्या कठड्याला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बस कठड्यावर चढली. त्यामुळे बस खाली पडणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र बस चालकाच्या हुशारीमुळे बस अधांतरीच राहिल्याने मोठा अनर्थ टळला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय बसमधील प्रवाशांनी अनुभवला आहे.
सत्यमंगलम-म्हैसूर राष्ट्रीय महामार्ग कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यात जाण्यासाठी वापरला जातो. जर ही बस उड्डाणपुलावरुन खाली कोसळली असती, तर मोठी प्राणहानी घडली असती. पण दैव बलवत्तर! बस चालकाच्या हुशारीमुळे मोठा अपघात होण्यापासून वाचला.