नवी दिल्ली -दिल्ली ते डिब्रूगढ जाणाऱया राजधानी एक्सप्रेसमध्ये 5 बॉम्ब असल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला आहे. एक्सप्रेस दादरी येथे असताना ही अफवा उडाल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. रेल्वेमधून प्रवाशांना बाहेर काढले असून गाडीची तपासणी करण्यात आली आहे. दरम्यान संबधीत माहिती देणाऱ्या व्यक्तीने गाडीमध्ये बॉम्ब नसून मानसिक तनावामधून टि्वट केल्याचे सांगितले आहे.
दिल्ली ते डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेसमध्ये बॉम्बच्या अफवेने गोंधळ - राजधानी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब
दिल्ली ते डिब्रूगढ जाणाऱया राजधानी एक्सप्रेसमध्ये 5 बॉम्ब असल्याच्या अफवेने एकच गोंधळ उडाला आहे.

संजीव सिंह गुर्जर या प्रवाशाने टि्वट करून रेल्वेमध्ये 5 बॉम्ब असल्याचे सांगितले होते. दिल्ली ते कानपूरला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये (12424) 5 बॉम्ब आहेत. कृपया लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, असे संजीवने टि्वटमध्ये म्हटले होते. त्याने ही टि्वट दिल्ली पोलीस, आयआरसीटीसीला आणि पियुष गोयल यांना टॅग केले होते. संजीव गुर्जरच्या टि्वटला प्रतिसाद देत रेल्वे पोलिसांनी दादरी येथे रेल्वेची तपासणी केली. मात्र, काही वेळानंतर संजीव गुर्जने मी गाडीमध्ये बॉम्ब असल्याचे टि्वट मी मानसिक तणावातून केले होते. आज माझ्या भावाची रेल्वे 4 तास उशीराने आली होती. त्यामुळे मला रेल्वे प्रशासनावर राग आला होता. याप्रकरणी मी भारत सरकारची माफी मागतो, असे टि्वट संजीवने केले आहे.
डिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस ही रेल्वे आसाममधील गुवाहाटी व दिब्रुगढ ह्या प्रमुख शहरांना दिल्लीसोबत जोडते. दिब्रुगढ राजधानी एक्सप्रेस दिब्रुगढ रेल्वे स्थानक ते नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते.