नवी दिल्ली - संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. दिल्लीतील प्रदूषण समस्येवरून लोकसभेमध्ये केजरीवाल सरकारला विरोधक घेरत आहेत. त्यातच भाजप नेते परवेश साहिब सिंह वर्मा यांनी लोकसभेमध्ये दिल्ली प्रदूषण प्रश्नावरून केजरीवालांवर टीका केली आहे.
गेली साडेचार वर्षे दिल्लीचे मुख्यमंत्री केवळ पंतप्रधान आणि दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर त्यांना काम करू देत नाहीत अशी तक्रार करत होते. गेल्या सहा महिन्यांपासून सर्वजण त्यांना काम करू देत आहेत, तर त्यांनी सर्व गोष्टी फुकट वाटण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीला त्यांनी आज जर काही दिले असेल, तर ते म्हणजे पाच वर्षांपूर्वी एकटे ते खोकत रहायचे, आज पूर्ण दिल्ली खोकत आहे. त्यांनी दिल्लीला बाकी गोष्टींसोबत प्रदूषणही मोफत दिले आहे. असे म्हणत वर्मा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.