लखनऊ- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे अचानक पिलीभीतच्या दौऱ्यावर गेले. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यात धक्कबुक्की होऊन सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या दाराची काच फुटली. यामुळे एका कार्यकर्त्याच्या हाताला जखमी झाली तर दुसऱ्या कार्यकर्त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याने दोघेही जखमी झाले आहेत.
अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ, दोन जखमी - pilibhit news
अखिलेश यादवांना भेटताना विश्रामगृहाच्या दाराची काच फुटली. यामुळे दोन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.
अखिलेश यादवांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांचा गोंधळ
अखिलेश यादव पिलीभीत दौऱ्यांवर कार्यकर्त्यांशी भेटून आजम ठाकूर बाबतच्या खटल्यासंदर्भातही माहिती घेण्यासाठी ते आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे अखिलेश यादव यांना पाहून कार्यकर्त्यांनी गर्दी केली. यामुळे येथे गोंधळ उडाला. यात येथील काचेचा दरवाजा फुटला येथील दोन कार्यकर्ते जखमी झाले.