नवी दिल्ली -जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेले कलम 370 रद्द करण्याचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. यानंतर भारतीय संसद इमारत नयनरम्य रोषणाईने सुशोभित करण्यात आली आहे.
भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित; पाहा छायाचित्रे - सुशोभित
भारतीय संसद इमारत नयनरम्य रोषणाईने सुशोभित करण्यात आली आहे.

भारतीय संसद नयनरम्य रोषणाईने सुशोभित
गृहमंत्री अमित शाह यांनी हे विधेयक दोन्ही सभागृहात मांडले होते. राज्यसभेत तांत्रिक कारणांमुळे या विधेयकावर चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आले. १२५ विरुद्ध ६१ मतांनी हे विधेयक मंजूर झाले आहे.
देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे कौतुक होत आहे. जम्मू काश्मीर राज्याचं विभाजन होऊन लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान राज्यसभेच्या आजच्या दिवसाचं कामकाज तहकूब करण्यात आले आहे.