नवी दिल्ली - आतंरराष्ट्रीय योग दिनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनी केलेल्या ट्विटमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता प्रसिद्ध सिने अभिनेते आणि माजी खासदार परेश रावल यांनीही राहुल गांधीची खिल्ली उडवली आहे. नव्या भारतामध्ये श्वानही तुमच्यापेक्षा जास्त हुशार असल्याचा खोचक टोला त्यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.
राहुलजी, हा नवा भारत आहे, येथे श्वानही तुमच्या पेक्षा जास्त हुशार आहेत, असे उत्तर त्यांनी ट्विटवर दिले आहे. राहुल गांधींनी योगदिनी दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये आर्मी श्वान पथकाच्या जवानांबरोबर श्वानही योगा करताना दिसत आहेत. या ट्विटला त्यांनी 'नया इंडिया' असे कॅप्शन दिले आहे. यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.