लखनऊ(आयोध्या) - काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तिघांची जमावाने हत्या केली. या प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले. अयोध्यातील स्वामी परमहंस महाराज या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत आरोपींना शिक्षा मिळत नाही तोपर्यंत अन्नाचा कणही खाणार नाही, अशी भूमिका परमहंस यांनी घेतली आहे.
स्वामी परमहंस महाराजांचे आमरण उपोषण; पालघरमधील आरोपींच्या शिक्षेची मागणी - स्वामी परमहंस महाराज
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात दोन साधूंसह तिघांची जमावाने हत्या केली. अयोध्यातील स्वामी परमहंस महाराज या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. हा मानवतेचा आणि भारतीय घटनेचा खून आहे, असे परमहंस यांनी म्हटले आहे.
परमहंस
या घटनेमुळे देश हादरला आहे. हा मानवतेचा आणि भारतीय घटनेचा खून आहे, असे परमहंस यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या प्रकरणात काँग्रेसचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला असून चौकशी करण्याची मागणी परमहंस यांनी केली.