महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंजाब : गुरूदासपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; मृतांचा आकडा 23 वर, 27 जखमी

पंजाबच्या बाटला मधील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे.

By

Published : Sep 5, 2019, 8:42 AM IST

पंजाब

चंदीगढ -पंजाबच्या बाटलामधील एका फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला आहे. या घटनेमध्ये 23 लोक ठार, तर 27 लोक जखमी झाले आहेत. बुधवारी सांयकाळी चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.

पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह ट्विट करत आपले दुःख व्यक्त केले आहे. दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाना प्रत्येकी दोन लाख तर जखमी लोकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गुरुदासपूरचे खासदार सनी देओल, तसेच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ट्विट करत आपले दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा -अन् महिलेने चालत्या दुचाकीवरून चोराला ओढून पाडले; सोनसाखळी चोराला घडली अद्दल

गुरुदासपूरच्या बाटला गावातील रहिवासी भागात हा कारखाना आहे. दिवाळी जवळ आल्यामध्ये कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फटाके बनवण्याचे काम सुरू होते. यावेळी आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची दोन पथके दाखल झाली होती. यासोबतच जिल्ह्यातील उच्च अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details