पणजी - गोवा कोरोनामुक्त ठरणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तरीही टाळेबंदी आणि अन्य उपायांची अंमलबजावणी सुरू आहे. पण, याकाळात काही प्रमाणात सूट देण्यात आली असल्याने आज मासळी बाजार उघडण्यात आले होते. तेव्हा सामाजिक अंतर राखून खरेदीसाठी खवय्यांची झुंबड उडालेली दिसत आहे.
मासळी आणि गोवा हे अतूट नाते आहे. तरीही लॉकडाऊनमुळे मागील महिनाभरापासून मासळी बाजर बंद होते. त्यामुळे मासे खाणेही बंद होते. गोव्यात सापडले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण यशस्वी उपचार करून गोवा कोरोनामुक्त झाल्यानंतर राज्या काही प्रमाणात लॉकडाऊनमधील निर्बंध सशर्त शिथील करण्यात आले. ज्यामुळे आज सकाळी मासळी बाजार उघडणार असल्यामुळे खव्वये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत गोवेकरांची मासे खरेदीसाठी गर्दी - गोवा कोरोनामुक्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात टाळेबंदीमुळे मासळी बाजार बंद होते. पण, गोवा राज्य कोरानामुक्त झाल्याने सशर्त मासे बाजार सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यामुळे बाजारात मासे खरेदी करण्यासाठी गोवेकरांनी गर्दी केली केली. यावेळी सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते.
गोव्यात सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणे अथवा मास्क लावणे, सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबरोबरच अन्य सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे. आज सकाळी मासळी बाजार उघडणार असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच मासे विक्रेत्यांसाठीही अंतर राखण्यासाठी जागा निश्चित करण्यात आले होते. त्याचबरोबर खरेदीदाराने सामाजिक अंतर राखणे बंधनकारक करण्यात आले होते. ज्याचे पालनही होताना दिसत होते. बांगडे, झिंगुर, लेपे आदी मासळी मोठ्याप्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध होती.
हेही वाचा -गोवा देशातील पहिलं कोरोनामुक्त राज्य; 'या' उपाययोजनामुळे महामारीवर मात